जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बारावीचा निकाल लागल्यानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया गतीमान झाली आहे. यात इंजिनिअरिंगसाठी आवश्यक असणार्या सीईटी परिक्षेसाठी गोदावरी अभियांत्रीकीने खास स्मार्टफोन ऍप्लीकेशन तयार केले असून याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
बारावी स्टेट बोर्डचा निकाल नुकताच लागला असून सीबीएसईचाही लवकरच लागणार आहे. यातच विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांसाठी (एंट्रन्स टेस्ट) धावपळ सुरू झाली आहे. यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. या परिक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून तयारी देखील सुरू केली आहे. या परिक्षेच्या तयारीत विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन गोदावरी फाऊंडेशन संचलीत गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजने एक स्मार्टफोन ऍप्लीकेशन तयार केले आहे. या ऍप्लीकेशनचे नाव जीएफ सीईटी/जेईई असून ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आलेले आहे. हे ऍप्लीकेशन पूर्णपणे मोफत असून यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येत नाही. यात दहा सराव पेपर्स (मॉक टेस्ट) असून यामुळे विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याआधीच याचा भरपूर सराव होऊन प्रत्यक्षातील परिक्षेसाठी लाभ होणार आहे.
यातील सराव पेपर्सचा निकाल हा इन्स्टंट लागत असून यासाठी कॉलेजतर्फे एक स्पर्धादेखील घेण्यात आलेली आहे. याच्या माध्यमातून सर्वाधीक गुण मिळविणार्या पाच विद्यार्थ्यांचा कॉलेजतर्फे सत्कार करण्यात येणार असल्याची बाब लक्षणीय अशीच आहे. तरी सीईटी देणार्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन गोदावरी अभियांत्रीकीचे प्राचार्य डॉ. व्ही.एच. पाटील यांनी केले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर मोबाईल ऍप्लीकेशन हे खालील लिंकवरून डाऊनलोड करून इन्टॉल करावे.
लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=com.libityinfotech.mock_test_cet