जळगावात शिंपी समाजाचा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

Marriage Certificate

जळगाव प्रतिनिधी | शिंपी समाज हितवर्धक संस्था व सहयोगी शाखा युवक मंडळ, महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २९ डिसेंबर रा ेजी जळगावातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे सकाळी ९ ते ५ या वेळेत वधू-वर परिचय मेळावा अायाेजित करण्यात अाला अाहे. मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून १५ डिसेंबरपर्यंत ९३५ अर्ज प्राप्त झाले आहेत. हे अर्ज महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात व विदेशातूनही अर्ज प्राप्त झाले आहेत.

२९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पंचमुखी गायत्री मंदिर येथून पालखी सोहळ्याने सुरुवात होऊन सकाळी १० वाजता मेळाव्याचे उद‌्घाटन विजय जगन्नाथ खैरनार यांच्याहस्ते होईल. शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील निकुंभ अध्यक्षस्थानी राहतील. स्वागताध्यक्ष शरद राजाराम बिरारी हे अाहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, महापौर सीमा भोळे, अ.भा. शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष डी. व्ही. बिरारी, विजय बिरारी, मदन पवार, दिलीप भांडारकर, संजय खैरनार उपस्थित राहतील. मेळाव्याची तयारी अंतिम टप्यात असून तीन महिन्यांपासून संस्थाध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव चंद्रकात जगताप, कोषाध्यक्ष संजय जगताप, दीपक जगताप, प्रशांत सोनवणे, महिला अध्यक्षा रेखा निकुंभ, विद्या सोनवणे, कुसुम बिरारी, आशा जगताप सहकार्य करीत आहे.

Protected Content