जळगाव प्रतिनिधी । येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता चेतना व्यसनमुक्ती संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील संकल्प यात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते महात्मा गांधी उद्यानपर्यंत होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्हाण, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, सामाजिक कार्यकर्ते सतिश देशमुख, रोटरी क्लबचे अध्यक्ष कॅप्टन एम.बी.कुलकर्णी, मनपाचे प्रभाग समिती सभापती रजंनाबाई वानखेडे यांची उपस्थिती राहणार आहे.
यात्रेच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब, भरारी फाऊंडेशन, प्रविण पाटील फाऊंडेशन, चिंतामणी फाऊंडेशन, युवा प्रेरणा फाऊंडेशन, साई मोरया गृप, वृक्ष संवर्धन समिती, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र, सुवर्णकार सेना, मु.जे. महाविद्यालयातील सायकॉलॉजी विभाग, पुष्कर बहुउद्देशीय संस्था अश्या विविध संघटना सहभागी होणार आहे. तरी या यात्रेत शहरातील नागरीकांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.