जळगाव प्रतिनिधी । रेल्वे स्टेशन येथे सोडून देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसलेल्या पाच जणांनी मुंबई येथील सेल्स मॅनेजरच्या खिश्यातून 39 हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या घटनेतील एका आरोपीला अटक करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आहे.
याबाबत माहिती अशी की, रोहिदास रखमाजी गायकवाड (वय 35) रा. गणेश नगर, गणेशदर्शन सोसायटी अमृत नगरजवळ, घाटकोपर मुंबई हे मुंबई येथील मेहुल इंटरप्राईजेस घाटकोपर येथे सेल्स मॅनेजर म्हणून गेल्या 11 वर्षापासून काम करत आहे. कंपनीच्या कामानिमित्त त्यांना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सेल्समन म्हणून ऑर्डर घेण्यासाठी जात असतात. 11 सप्टेंबर रोजी रविदास गायकवाड आणि सोबत गिरीश वाघेला हे दोघे मुंबईहुन जळगाव येथे कॅटर्स वाल्यांकडे ऑर्डर घेण्यासाठी सकाळी 6 वाजेच्या सुमारास जळगावात आले. जळगावातील काही कॅटर्सवाल्यांनी भेटून त्यांचे ऑर्डर घेऊन व ॲडव्हॉन्स रक्कम घेऊन पुन्हा ते शहरातील रामनिवास लॉजवर आले. पुन्हा दुसऱ्या दिवशी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10च्या सुमारास रिक्षात बसून शहरातील व एमआयडीसी भागात राहणाऱ्या कॅटर्रच्या मालकांना भेटून राहिलेली रक्कम 39 हजार 250 रुपये त्यांच्याकडून घेतले. त्यानंतर पुन्हा ते रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी भुसावळ रोड वरील हॉटेल प्रीतम पार्कच्या मागे कालिंका मातानगर येथे रिक्षाची वाट बघत असताना एक कार त्यांच्या समोर उभी राहिली. त्या कारमध्ये मागे तीन, चालक आणि चालकाच्या बाजूला एक असे एकूण पाच जण बसलेले होते. त्यांनी स्टेशन वर जात आहेत का असे विचारले असता त्यांनी स्टेशनवर घेऊन जाण्यासाठी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास कारमध्ये बसवले. यावेळी चालकाच्या बाजूला बसलेला इसम खाली उतरून रोहिदास गायकवाड यांच्या ताब्यातील बॅग मागील बसलेल्या व्यक्तींकडे दिले. त्यानंतर त्याच व्यक्तीने गायकवाड यांच्या त्यांच्या खिशातून 39 हजार 250 रूपयांची रोकड काढून घेतली. गायकवाड यांना खाली उतरून कार भुसावळकडे फरार झाली. याप्रकरणी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलीसांनी गुप्त माहितीनुसार स.फौ. अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पो.ना. मनोज सुरूवाडे, सचिन पाटील, मुद्दसर काझी यांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता मंगलराव खयालीरामजी राव (वय-30) रा. इदगाह मोहलला उन्हैल नाल्याजवळ, उन्हैल ता. नागदा जि. उज्जैन मध्यप्रदेश याला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.