जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठपुराव्याने शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी अजून पाच कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे.
आमदार राजूमामा भोळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे काही दिवसांपूर्वीत १०० कोटी रूपयांचा निधी मिळाला असून यातून शहरातील ४२ रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. या पाठोपाठ आता आज पुन्हा एकदा पाच कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून शहरातील आठ रस्त्यांची कामे होणार आहेत.
या रस्त्यांमध्ये मेहरूण तलाव परिसरातील गणेश घाट ते लेक रेसिडन्सी या रस्त्यांचे डांबरीकरण- ५० लक्ष रूपये; प्रभाग-१४ मधील गट क्रमांक ४१४ कंपाऊंडच्या आतील पाच रस्त्यांचे डांबरीकरण-६० लक्ष रूपये; प्रभाग़ क्रमांक ०६ आणि १६ अंतर्गत रूख्मा टेंट हाऊस ते सुपारी कारखाना आणि गणेश अपार्टमेंट ते पार्श्वनाथ प्लास्टीक रस्ता कॉंक्रिटीकरण-२ कोटी १० लक्ष रूपये; प्रभाग क्रमांक ०६ अंतर्गत रामदेव बाबा मंदिर ते लिटील प्ले स्कूलपर्यंतचे डांबरीकरण-३८.२५ लक्ष रूपये; प्रभाग क्रमांक ०७ मध्ये ऍक्झॉन ब्रेन हॉस्पीटल ते प्रमोद बसेर यांच्या घरापर्यंतचे डांबरीकरण-६७.२५ लक्ष रूपये; प्रभाग क्रमांक १२ मध्ये टोके ते झंवर यांच्या घरापर्यंत डांबरीकरण-३२.५० लाख रूपये; प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत रामानंद नगर रिक्शा स्टॉप ते श्री अत्तरदे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण-२२ लक्ष रूपये आणि प्रभाग १३ अंतर्गत श्री डोंगरे यांच्या घरापासून ते अमोल चौधरी यांच्या घरापर्यंत ते श्री सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे-२० लक्ष रूपये यांचा समावेश आहे.
दरम्यान, जळगावातील रस्त्यांसाठी पाच कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी मिळाल्याबद्दल आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. रस्त्यांची ही कामे लवकरच होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.