शिवाजी नगरात मध्यरात्री रोकडसह दोन मोबाईल लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर राहणाऱ्या एका महिलेच्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल आणि १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रेमलता विनोद तिवारी (वय-४०) रा.शिवाजीनगर, जळगाव या महिला आपल्या पती, मुलगा आणि मुलगी यांच्या सहवास्तव्याला आहे. त्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामाला आहेत. मंगळवारी ११ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटा चोरी करण्याच्या इराद्याने घरात घुसला होता. त्यावेळी प्रेमलता तिवारी ह्या झोपेतू जाग्या झाल्या. त्यांनी पाहिले तर अज्ञात चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसल्याचे दिसून आले. त्यांना जाग आल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरातून धुम टोकली. त्यांनी घरात चेक केले असता त्यांचा आणि त्यांच्या मुलीचा मोबाईल व पगाराचे १५ हजार रूपये चोरून नेल्याचे लक्षात आले. याबाबत महिलेने मंगळवारी ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content