जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणार्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आज एनएसयुआयतर्फे याचा निषेध करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री हे उडविण्याच्या धमकीचे फोन दुबईवरून कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या हस्तकांनी दोन ते तीन फोन कॉल करून या प्रकारची भ्याड धमकी दिली. याचा जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली दाऊद इब्राहिम याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांचा अतिशय जिव्हाळ्याचा व श्रद्धेचं स्थान असलेल मातोश्री हे निवासस्थान आहे. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याने याआधी सुद्धा अशा प्रकारच्या भ्याड धमक्यांचे फोन मातोश्री वरती केलेले संपूर्ण भारताने बघितलेले आहे व त्याच पद्धतीने काल देखील अशाच प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या. परंतु मातोश्री हे नागरिकांच्या मनातील श्रद्धेचे स्थान असल्यामुळे मातोश्री वरती अशा कितीही प्रकारच्या धमक्या आल्या तरी मातोश्रीचे कधीही काही नुकसान हे होणार नाही.
मोदी सरकारने राजकारण करण्यापेक्षा दाऊदला भारतात आणण्यात शक्ती लावावी मोदी सरकार भारत देशातील नागरिकांच्या भावनांशी जो काही खेळ करीत आहे तो मोदी सरकारने तात्काळ थांबवावा व कुख्यात आतंकवादी दाऊदला दुबई सरकारने व पाकिस्तान सरकारने आश्रय दिलेला आहे तसेच 1993 च्या बॉंब स्पोटामधील मुख्य आरोपी असलेला कुख्यात आतंकवादी हा अजूनही भारत देशाच्या हातात लागत नाही आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा एनएसयुआय च्या वतीने हीदेखील मागणी करण्यात आली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाच्या नागरिकांसोबत राजकारण करण्यापेक्षा कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याला भारतात पकडून आणण्यासाठी आपली शक्ती लावावी.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, उपाध्यक्ष शाम तायडे, अमजद पठाण, पी जी पाटील, वासुदेव महाजन, भरत ललवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/345461070149313