ढाब्यावर तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

Crime 1

जळगाव प्रतिनिधी । जेवणाच्या आर्डरवरून एका तरूणाला तिघांनी बेदम मारहाण लोखंडी आसारीने जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हॉटेल कम्लेश ढाबा येथे घडली. याप्रकरणी तिघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, समाधान राजेंद्र गडवे (वय-22) रा. कौतीक नगर हे शहरातील कम्लेश ढाबा येथे जेवणासाठी रात्री 12 वाजता बसले. त्यावेळी बाजूच्या टेबलावर संशयित आरोपी विजय घोडेवाल व इतर दोनजण बसले होते. रात्री 12.30 वाजेच्या सुमारास वेटरला समाधान गडवे यांने बोलावून जेवणाची ऑर्डर दिली त्याचवेळी विजय घोडेवाल याने ऑर्डर दिली होती. दरम्यान जेवणाच्या आर्डरवरून दोघांमध्ये वाद झाला. यात समाधान गडवे याला विजय घोडेवाल आणि इतर दोघांनी बेदम मारहाण केली त्यानंतर लोखंडी आसारीने मारहाण करून जबर जखमी केले. याप्रकरणी समाधान गडवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात तिघांविरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल पाटील करीत आहे.

Protected Content