जळगाव प्रतिनिधी । नूतन मराठा महाविद्यातील ईलेक्ट्रॉनिक विभागातील प्राध्यापकाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नुतन मराठा महाविद्यालयातील ईलेक्ट्रॉनिक विभागातील प्राध्यापक किशोर यादवराव देशमुख (वय-58) रा. शिवकॉलनी हे आजाराला कंटाळून राहत्या घरात मध्यरात्री वरच्या मजल्याच्या खोलीत पंख्याला साडीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी नेहमीप्रमाणे पत्नी कुमूदीनी ह्या पती किशोर यांना उठविण्यासाठी गेले असता त्यांनी आतून दार बंद केले होते. शेजारच्यानी दरवाजा तोडून पाहिले असता त्यानी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होते. दरम्यान नूतन मराठा महाविद्यातील मनमिळावू व शांत स्वाभावाची त्यांची ओळख आहे. ते नेहमी कमी बोलत होते. दरम्यान महाविद्यालयातील किमान कौशल्य संदर्भातील इनस्पेक्शन असल्याने महाविद्यालयात तयारी सुरू होती. त्याची विवाहित मुलगी केतकी ही अमेरीकेला राहते. दोन दिवसांपासून मुलगी घरी आली होता. तर मुलगा कुणाला हा मुंबई येथील आसीआरच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे.
मयत किशोर देशमुख हे नूतन मराठा महाविद्यालयात 1987 पासून प्राध्यापक म्हणून काम करत होते. अवघ्या सहा महिन्यानंतर त्यांची सेवानिवृत्ती होती. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, लहान भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.