जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतांना गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही.
एकीकडे लसीकरणाला वेग आलेला असतांनाच दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग देखील कमी झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर, गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. तर याच कालावधीत एकही रूग्ण बरा झालेला नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या रिपोर्टमधून अधोरेखीत झाले आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १२ रूग्ण असून यातील आठ हे होम आयसोलेशन मध्ये तर चार कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार घेत आहेत. याचा अपवाद वगळता जिल्ह्यात कुठेही कोरोना रूग्ण आढळून आले नसल्याने आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.