जळगाव सचिन गोसावी । जळगावातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे गत तब्बल ६३ वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा व वैश्वीक पातळीवर ख्यात असणार्या वर्सी महोत्सवाला यंदा कोरोनामुळे ऑनलाईन या पध्दतीत साजरे करण्यात येत आहे.
सिंधी समाजबांधवाची संत कंवरराम, संत सतरामदास व संत हरदासराम या संत त्रयीवर अपार श्रध्दा असून त्यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव साजरा केला जातो. वर्सी महोत्सवाची तेजोमय परंपरा, या महोत्सवाची व्याप्ती, भाविकांची श्रध्दा व कोरोनाच्या सावटाखालील यंदाची ऑनलाईन सुविधा या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती आपल्याला या स्पेशल रिपोर्टमध्ये मिळेल.
जळगाव येथील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे वर्सी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यासाठी दर वर्षी देश-विदेशातून लाखो भाविक जळगावात येत असतात. संत कंवरराम, संत सतरामदास व संत हरदासराम या संतांच्या पुण्य स्मरणार्थ या महोत्सवाचे गत ६३ वर्षांपासून अव्याहतपणे आयोजन करण्यात येत आहे. हे अतिशय चैतन्यदायी व भक्तीभावाने ओसंडून वाहणारे पर्व असते. तथापि, यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे हा महोत्सव ऑनलाईन या प्रकारात साजरा करण्यात येत आहे.
कोरोनामुळे सर्व देवस्थाने बंद असल्याने यंदाचा वर्सी महोत्सव हा फक्त ऑनलाईन या प्रकारात उपलब्ध करण्यात आलेला आहे. यात लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून भाविक हे दर्शन घेऊन आशिर्वाद व कृपा प्रसादाची आराधना करत आहेत. दर वर्षी वर्सी महोत्सवात विशाल जनसमुदायासाठी भंडार्याचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र ट्रस्टने भाविकांना घरोघरी प्रसाद पोहचवण्याची व्यवस्था केली आहे.
यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे समस्त मानवजात भयग्रस्त झालेली असल्याने यापासून मुक्ती मिळावी म्हणून समाजबांधवांतर्फे विशेष प्रार्थना करण्यात आली आहे. तर ऑनलाईन दर्शनाच्या माध्यमातूनच भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणार असल्याचा विश्वास येथील धर्मगुरूंनी व्यक्त केला आहे.
खालील व्हिडीओत पहा ऑनलाईन वर्सी महोत्सवाबाबतचा सविस्तर वृत्तांत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/363544068311259