जळगाव प्रतिनिधी । भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी जळगाव येथील नगरसेविका उज्वला किरण बेंडाळे यांची निवड करण्यात आली आहे.
उज्वला बेंडाळे या जळगाव महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत असून भाजपच्या संघटनात त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. यात महिला आघाडी शहर सरचिटणीस, शहर अध्यक्ष व जिल्हा चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, म.न.पा शिक्षण मंडळ सदस्य आदींचा समावेश आहे. तर त्या दोनदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. या कामाची दखल घेत भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा उमा खापरे यांनी नुकतीच नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली आहे.
उज्वला बेंडाळे यांच्या या निवडीचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, डॉ. राजेंद्र फडके, विभागीय संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.