जळगाव प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून जळगावात उद्यापासून दोन दिवसीय युवा संसद आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव । तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात येते. जिल्हास्तरावर ऑनलाइन पद्धतीने संसद घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हा आणि राज्यस्तरावर आपली निवड होणे आवश्यक असते. जळगाव जिल्ह्याची युवा संसद २८ आणि २९ डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर युवा संसदमध्ये सहभागी होण्यासाठी आपले अर्ज नेहरू युवा केंद्र द्रौपदीनगर, मानराज पार्कजवळ येथे कार्यक्रम सहाय्यक अजिंक्य गवळी यांच्याकडे जमा करायचे आहेत. दरम्यान, या संसदेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केलेे आहे.