जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर उस्मानिया पार्क येथील आरीफ खान रशीद खान (३३ ) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना घडली रात्री घडली.
अनेक दिवसांपासून हाताला काम नसल्याने आरीफ तणावात होता असे नातेवाईकांनी सांगीतले. दरम्यान, दुपारी पती पत्नीत वाद झाला होता, हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. यानंतर त्याने गळफास घेतला. आरीफ यास रात्री दहा वाजता त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तपासणी मयत घोषीत केले. आरीफखान यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व आई-वडील असा परिवार असून खासगी वाहनावर तो चालक म्हणुन कार्यरत होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.