जळगाव जितेंद्र कोतवाल । आपली मुलगी कांचन हिने गल्लीतीलच प्रमोद शेटे याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र तो तिला मारहाण करत होता. याबाबत पोलीसात तक्रार देखील करण्यात आली होती. यानंतर समझोता झाला असला तरी तिला त्रास होतच होता. यामुळे प्रमोद शेटे याने आपल्या मुलीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा आरोप मृत तरूणीचे वडिल राजेंद्र वाणी यांनी केला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील कांचननगर परिसरात रहिवासी असणार्या प्रमोद शेटे या तरूणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर प्रमोद शेटे याने आज सकाळी रेल्वे खाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी प्रमोद शेटे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह केले. यात त्याने आपला चेहरा न दाखविता आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. आपली पत्नी या जगात नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने नमूद केले.
दरम्यान, कांचन शेटे हिचे वडिल राजेंद्र वाणी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, आपली मुलगी कांचन हिने गल्लीतीलच प्रमोद शेटे याच्याशी प्रेमविवाह केला होता. जावई मयत प्रमोद शेटे हा मुलीस मारहाण करत होता. याबाबत शनिपेठ पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. नंतर मात्र समझोता होऊन ते सोबत राहत होते. या दाम्पत्याला तीन व दीड वर्षाच्या दोन मुली आहेत. त्या आजारी असल्याने काल सायंकाळी डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी कांचनने पैसे मागितले. मात्र प्रमोद शेटे याने पैसे दिले नाही. यानंतर आज सकाळी आपल्या मुलीचा विष प्राशनाने मृत्यू झाला. तर जावयाचे आत्महत्या केली. प्रमोद शेटे यानेच आपल्या मुलीस मारल्याचा आरोप राजेंद्र वाणी यांनी केला.
खालील व्हिडीओत पहा राजेंद्र वाणी नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/792768278122477