उत्साहात मात्र, साधेपणाने साजरी करा दिवाळी ! : पोलीस अधिक्षक ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे या वर्षाची दिवाळी ही उत्साहात मात्र साधेपणाने आणि सर्व नियमांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्हावासियांना केले आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या संदेशात लोकांनी यंदा साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे नागरिकांनी या आधीचे सण ज्या पध्दतीत साधेपणाने साजरे केले, त्याच प्रकारे दिवाळी देखील नियमांचे पालन करून साजरी करावी. यात फिजीकल डिस्टन्सींगचे नियम पाळावेत, मास्क घालावा व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील नागरिकांनी यंदाची दिवाळी ही गर्दीमुक्त व फटाकेमुक्त या प्रकारात साजरी करावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्हा वासियांना आवाहन केले आहे. या व्हिडीओची निर्मिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या सहकार्याने केली आहे.

खालील व्हिडीओत पहा जिल्हा पोलीस अधिक्षक नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/780132365877833

Protected Content