राज्यपालांना पदावरून हटवा : गजानन मालपुरे यांचे राष्ट्रपतींना पत्र

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे एकाच राजकीय पक्षाला धार्जिणे असणारे वक्तव्य व वर्तन करत असल्याने त्यांना या पदावरून हटविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहले आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गेल्या अनेक दिवसांपासून जे वक्तव्य व जो व्यवहार करीत आहेत तो पक्षधार्जिणा आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व विसरल्याबाबत केलेला पत्रव्यवहार निंदनीय होता. तसेच अभिनेत्री कंगणा राणावत मुख्यमंत्री आणि पोलिस दलावर आरोप करत आसताना तिला तातडीने भेट देणे, एका वृत्त वृत्तवाहिनीच्या संपादकाच्या जीवाची चिंता व्यक्त करतात. यामुळे राज्यपाल पदाची गरीमा कुठेतरी ढासळली जाऊन त्या पदाचा अवमान होतोय.

यात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस दलाचा संपूर्ण जगात नावलौकिक आहे. या पोलीस दलावर अभिनेत्री कंगना रणावत दलावर बेछूट आरोप करीत होती. या अभिनेत्रीला महामहिन राज्यपाल यांनी राजभवनात भेट दिली. ही बाब महाराष्ट्राचे हिताची नाही. रिपब्लीक भारत नावाच्या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी एका व्यक्तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा करण्यासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. अशा संशयित आरोपीविषयी केंद्रीय गृहमंत्री यांनी संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. जिवीताची चिंता व्यक्त करतात व त्याच्या आरोपीच्या नातेवाईकांना भेटीसाठी दबाव आणतात हे निंदनिय आहे. हा प्रकार अप्रत्यक्षरित्या स्व. अन्वय नाईक परिवाराला न्यायापासून वंचित ठेवणारा आहे. यामुळे महामहिम राज्यपाल यांची या प्रकरणात भूमिका संशयातित आहे. पोलीस तपासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ढवळाढवळ करण्यासारखा प्रकार आहे. या प्रकारामुळे महामहिम राज्यपाल पदाची गरीमा ढासाळली जाऊन त्या पदाचा अवमान होतोय की काय असे वाटायला लागले आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट विचारांची व्यक्ती इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणते आहे असे दिसते. यातून कोणी न्यायदानास मुकले जाण्याची दाट शक्यता आहे.

राज्यपालांच्या वर्तनामुळे छत्रपती शिवराय, फुले, आंबेडकर, टिळक, आगारकरांच्या विचारांना तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल पदाची गरीमा राखण्यासाठी महामहिम राज्यपालपदावरून भगतसिंग कोशारीसाहेब यांची उचलबांगडी करावी. महाराष्ट्राच्या इतिहासाला शोभेल व राज्यपाल पदाला न्याय देऊन पदाची गरीमा राखेल अशा न्यायप्रिय व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Protected Content