जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर आज पोलिसांनी छापा टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शहरातील गोलाणी मार्केटमधील तिसर्या मजल्यावर देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक विजय ठाकूरवाड यांना मिळाली होती. त्यांनी या प्रकरणी कारवाईसाठी सपोनि दत्तात्रय पोटे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले.
या पथकातील पोलीस कर्मचारी हे डमी ग्राहक बनून संबंधीत कुंटणखान्यात गेले. यानंतर येथे छापा टाकून सात जणांना अटक करण्यात आली आहे. यात कुंटणखान्याची मालकीण असणार्या स्त्री सह पाच पहिला आणि एक ग्राहक यांचा समावेश आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या सर्वांना शहर पोलीस स्थानकात आणले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय पोटे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली.