जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे नूतन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी ना.गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी ना. पाटील यांनी विद्यापीठाला आपले सर्वतोपरी सहकार्य असल्याची ग्वाही दिली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची धुरा नुकतीच डॉ. विनोद प्रभाकर पाटील यांनी घेतली असून त्यांनी आज ना.गुलाब राव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली असता ते बोलत होते. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी ना. गुलाबराव पाटील यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आपण आजवर विद्यापीठाच्या विविध कामांना गती देण्याचा प्रयत्न केला असून भविष्यात देखील या प्रकारचे सहकार्य कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. आपल्या विद्यापीठातील दर्जेदार शिक्षणाची ख्याती ही देश-विदेशात पोहचवावी. आणि हा लौकीक वाढविण्यासाठी आपल्याला हवे असणारे सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
तर, नूतन कुसाचिव डॉ.विनोद पाटील यांनी आपण विद्यापीठाचा लौकीक वाढविण्यासाठी नेहमीच कटिबध्द राहू अशी ग्वाही देत ना.गुलाबराव पाटील यांच्या कडून विद्यापीठाला आजवर जे सहकार्य मिळाले आहे तसेच भविष्यातही सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपअभियांता राजेश इच्छाराम पाटील, सुरेश डी. चव्हाण, सोपान पाटील, नारायण सोनवणे, राजेंद्र चव्हाण, नवलसिंग पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.