Home Cities जळगाव ‘हंस अकेला’च्या सादरीकरणातून परिवर्तन कला महोत्सवाची सांगता

‘हंस अकेला’च्या सादरीकरणातून परिवर्तन कला महोत्सवाची सांगता

0
59

जळगाव Jalgaon प्रतिनिधी । संत कबीरांचा संगीतमय पद्धतीने शोध घेणार्‍या ‘हंस अकेला’च्या सादरीकरणातून पुणे येथे सुरू असलेल्या परिवर्तन कला महोत्सवाची सांगता करण्यात आली.

नाटकघर व अतुल पेठे आयोजित तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सवाचा समारोप संत कबीरांचा संगीतमय पद्धतीने शोध घेणार्‍या ‘हंस अकेला’ने करण्यात आला.

या कार्यक्रमात मन लागो यार फकिरी मे…हे गीत सुफी गायकी, वेस्टर्न, क्लासिकल, कव्वाली, पारंपरिक कबीर गायकी याप्रकारात गायन करून सुरुवात करून श्रद्धा कुलकर्णी, अनुषा महाजन, अक्षय गजभिये यांनी वेगवेगळ्या संगीत लयाचा वापर करून मैफल जिंकून घेतली. विशाल कुलकर्णी यांनी पारंपरिक पद्धतीची कबीराची गायकी तर शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींनी कबीराचे दोहे अक्षय गजभिये यांनी सादर केले. बंगाली बाऊलचा गोडवा साक्षी पाटील हिने उभा केला. खड्या स्वरात प्रतीक्षा कल्पराज हिने कोई नही अपना म्हणत आर्त स्वर लावला. माटी कहे कुंभार से यातील दार्शनिक तत्त्व हर्षदा कोल्हटकर यांनी उलगडून दाखवलं. तर ब्रज भाषा व खडी बोलीतले दोहे नारायण बाविस्कर, विनोद पाटील यांनी सादर केले. बासरीवरची साथसंगत योगेश पाटील यांची होती तर ढोलकी, तबला, झेंबे या तालवाद्यांची बाजू मनीष गुरव यांनी सांभाळली. Parivartan Kala Mahotsav Pune

समारोपाच्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते ओंकार गोवर्धन, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, लेखिका गीतांजली वि.म, अनिल पाटकर उपस्थित होते. हंस अकेलाचं निवेदन शंभू पाटील यांनी केले. तर, प्रतीक्षा कल्पराज हिने समोरोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


Protected Content

Play sound