Home क्राईम जळगावात पुन्हा खून; तरूणावर वार करून क्रूर हत्या

जळगावात पुन्हा खून; तरूणावर वार करून क्रूर हत्या

0
180


जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतांनाच इंद्रप्रस्थ नगरमध्ये भूषण भरत सोनवणे या तरूणावर टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून त्याची हत्या केल्याची घटना रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे.

वर्चस्वाच्या वादातून शिवाजीनगर परिसरात काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगरातील रिक्षा थांब्यावर भूषण भरत सोनवणे सोनवणे उर्फ अठ्ठा (३०, रा. इंद्रप्रस्थनगर) याच्यावर एका टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मारेकरी तीन जण असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिसर्‍याचा शोध सुरू होता.

शिवीगाळ केल्यावरुनच्या वादातून ही खुनाची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अतुल काटकर (रा. शिवाजी नगर), प्रतिक निंबाळकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर अजून एक जण फरार झाल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound