जळगाव प्रतिनिधी । जळगाव विमानतळावर आता नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध झाली असून यामुळे आता विमान सेवेला चालना मिळण्याची शक्यता आहे.
जळगाव विमानतळावर नाइट लँडिंगच्या सुविधेला जानेवारी २०२० मध्ये परवानगी मिळाली होती. तथापि, कोरोनाच्या आपत्तीमुळे विमानसेवा अनेक महिने बंद असल्याने याच्या प्रत्यक्ष वापराला विलंब झाला. आता मात्र ही सेवा सुरू झाली आहे. जळगाव विमानतळावर बुधवारी पहिल्यांदाच ७२ आसनी विमानाने नाइट लँडिंग केले. यामुळे मुंबई व अहमदाबाद या दोन्ही शहरांमधील विमानांच्या फेर्या वाढू शकतात. यासोबत जळगाव-पुणे आणि जळगाव-इंदूर या दोन नवीन मार्गावर विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.