जळगाव प्रतिनिधी । महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीचे आज पुनर्गठन करण्यात आले असून यात नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आल्याचे महापौर भारतीताई सोनवणे यांनी जाहीर केले आहे.
थायी समितीमधून ३१ सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त होणार्या आठ जागांवर पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी नव्याने सदस्य निवडीकरिता बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा महापौरांनी बोलविली होती. यात स्थायी समितीवर आठ नवीन नावे जाहीर करण्यात आली. यात भाजपच्या सात तर शिवसेनेच्या एका सदस्याचा समावेश आहे.
दरम्यान, याच बैठकीत महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीचे पुनर्गठन करण्यात आले. यात भाजपतर्फे दिपमाला काळे, सुरेखा सोनवणे, पार्वता भिल, प्रतिभा पाटील, गायत्री राणे, प्रिया जोहरे व रंजना सपकाळे तर शिवसेनेतर्फे शबानाबी खाटीक आणि जिजाबाई भापसे यांची निवड झाली. महापौर भारतीताई सोनवणे यांनी याबाबतची घोषणा केली.