जळगाव प्रतिनिधी । खासदार नंदूभैय्या चौहान यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर, फग्गनसिंग कुलस्ते व थावरचंद गेहलोत यांच्या सोबत खासदार रक्षाताई खडसे यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली.
खंडवा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नंदूभैय्या चव्हाण यांचे काल निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर बर्हाणपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी कृषी व शेतकरी मंत्री तथा ग्रामीण विकास व पंचायती राजमंत्री नरेंद्र तोमर, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, स्टील राज्यमंत्री फगनसिंग कुलुस्ते आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधिया हे मान्यवर जळगाव विमानतळावर आले असता खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे याच्या नेतृत्त्वात स्थानिक शेतकर्यांच्या अडचणींबाबत ग्रामीण व कृषी मंत्र्यांना अवगत करण्यात आले. तसेच शेतकर्यांनी त्यांच्या समस्या समक्ष कृषी मंत्र्यांकडे मांडल्या. शेतकर्यांच्या समस्येबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन ग्रामीण व कृषी मंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उज्ज्वलाताई पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महापौर सौ भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी, दीपक साखरे, राधेशाम चौधरी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.