जळगाव प्रतिनिधी । भाजपने जळगावकर नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसून फक्त ठेकेदारांची घरे भरली अशी तोफ भाजपचे बंडखोर नगरसेवक तथा शिवसेनेचे उपमहापौरपदाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी आज तोड डागली आहे. भाजपमधील ३० सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
गत काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय सस्पेन्स आज संपला असून ३० नगरसेवकांनी भाजपचा त्याग करत शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती कुलभूषण पाटील यांनी दिली. ते म्हणाले २०१८ साली भाजपने जळगावकरांनी खूप मोठी आश्वासने दिली होती. मात्र प्रत्यक्षात असे झाले नाही. भाजपने फक्त ठेकेदारांची घरे भरली. यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश केला असून आपल्यासोबत ३० नगरसेवकांनी भाजपचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती देखील कुलभूषण पाटील यांनी दिली.
दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांच्यावर कुलभूषण पाटील यांनी जास्त नाराजी व्यक्त केली. तर आ. गिरीश महाजन हे देखील दखल घेत नसल्याचे ते म्हणाले.