खान्देश ब्राह्मण संमेलन यशस्वी करण्याचा संकल्प

जळगाव प्रतिनिधी । येथे २८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या खान्देश ब्राह्मण संमेलनास यशस्वी करण्याचा संकल्प नियोजनाबाबतच्या बैठकीत घेण्यात आला.

ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्था पुरस्कृत खान्देश ब्राह्मण आघाडीतर्फे २८ फेब्रुवारी रोजी खान्देश ब्राह्मण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या नियोजनासंदर्भात राजस्थान ब्राह्मण संघाचे अध्यक्ष घनश्याम नागोरी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी ब्रह्मश्रीचे अध्यक्ष दिनकर जेऊरकर यांनी प्रास्ताविक केले. बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अशोक वाघ यांनी हे संमेलन घेण्यामागचा उद्देश सांगत एकत्रीकरणासाठी संघटित होणे कसे आवश्यक आहे हे स्पष्ट केले. या वेळी जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष व्ही.पी. कुलकर्णी, अजय जोशी, अजय कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, संजय कुलकर्णी, भूपेश कुलकर्णी, नितीन मटकरी, अविकुमार जोशी, डिंपल कुलकर्णी, संजय खेडकर यांसह सुरभी महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी, मानिनी तपकिरी, बहुभाषिक महिला मंडळाच्या अध्यक्षा अमला पाठक यांनी आपले विचार व्यक्त केले.

जळगावात आयोजीत खान्देश ब्राह्मण संमेलन यशस्वी करण्याचा संकल्प याप्रसंगी घेण्यात आला.

Protected Content