जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या आपत्तीमुळे लागू असणार्या कडक निर्बंधांमुळे लोक कलावंतांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. यामुळे कलावंतांच्या मदतीसाठी समाजातील दानशुरांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन खान्देश लोक कलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले आहे.
खान्देश लोक कलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून कलावंतांना मदतीने आवाहन केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून कोरोना या जागतिक महामारीच्या काळात समाजातल्या सर्वच घटकांवर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या बिकट अवस्थेमध्ये जास्तीत जास्त नुकसान झाले ते हाताहवर पोट असलेल्या लोककलावंतांचे,…!
जिल्ह्यातील तमाशा, शाहीर व इतर लोककलावंताची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सध्य परिस्थिती जिल्ह्यातील अनेक लोककलावंताचे मदती साठी फोन येत आहेत. त्यात प्रामुख्याने तमाशा कलावंत व शाहीर कलावंत यांची स्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्यातील अत्यंत गरजु व गरिब कलावंत यांची संख्या ९० ते १०० कलावंत आहे. खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या माध्यमातून आम्ही लोकलावंताच्या मदती साठी लोकप्रतिनिधी, दानशुर मान्यवरांना आवाहन करीत आहोत. या लोककलावंनांता एक महिना पुरेल असा जीवनावश्यक किराना देण्यासाठी आपण मदत करावी असे आवाहन विनोद ढगे यांनी केले आहे.
या संदर्भात दानशुरांनी विनोद ढगे यांच्याशी ९४२२७८२२४७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.