जळगाव jalgaon प्रतिनिधी । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शहरात लावलेल्या शुभेच्छा फलकांवर अखेर एकनाथराव खडसे यांचा फोटो लावण्यात आला असला तरी यातून राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील jayant patil in jalgaon हे जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा सुरू आहे. या अनुषंगाने काल सायंकाळी जळगाव शहरात माजी मंत्री गुलाबराव देवकर gulabrao deokar यांच्या समर्थकांनी ना. पाटील यांच्या स्वागतासाठी भव्य फलक लावले होते. यावर पक्षाच्या नेत्यांना प्रोटोकॉलनुसार स्थान देण्यात आले असले तरी अलीकडेच पक्षात आलेल्या एकनाथराव खडसे eknath khadse यांना स्थान नसल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी प्रसारमाध्यमांमधून बातम्या प्रकाशित झाल्यानंतर अखेर शहरात नवीन फलक लावण्यात आले आहेत.
या नवीन फलकांवर एकनाथराव खडसे यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याआधी शरद पवारांसह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील नेत्यांची मते जाणून घेतली होती. यात काही ज्येष्ठ नेत्यांनी खडसेंच्या प्रवेशाला विरोध दर्शविला होता. मात्र खडसेंच्या मुंबई येथील प्रवेशाप्रसंगी सर्व नेत्यांनी हजेरी लावल्याने सारे काही आलबेल असल्याचे दिसून आले होते. मात्र फलकावर फोटो लावलण्याच्या कृत्यातून राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह हा नव्याने समोर आल्याचे दिसून येत आहे.