जळगाव प्रतिनिधी । एकीकडे हायकोर्टातील तिन्ही याचिका खारीज झाल्याने भाजपला धक्का बसला असतांना त्यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने घरकूल प्रकरणात दोषी ठरलेल्या चार उमेदवारांना मतदान करता येईल असा निर्णय दिला आहे.
शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करत भाजपचे कैलास सोनवणे, भगत बालाणी, दत्तात्रय कोळी, लता भोईटे व सदाशिव ढेकळे हे पाच नगरसेवक घरकुल घोटाळ्यात दोषी ठरल्याने त्यांना अपात्र करण्याची याचिका अॅड. सुधीर कुलकर्णी यांच्या मार्फत दाखल केली होती. आज यावर सुनावणी करण्यात आली. यातील कैलास सोनवणे हे स्वीकृत सदस्य असल्याने त्यांना उद्याच्या निवड प्रक्रियेत मतदान करता येणार नाही. तथापि, उर्वरित चौघांनाही मतदानास मज्जाव करावा अशी मागणी प्रशांत नाईक यांनी जिल्हा न्यायालयाकडे केली होती.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घरकूल प्रकरणातील दोषी नगरसेवकांना उद्या होणार्या महापौर आणि उपमहापौर निवड प्रसंगी मतदान करता येईल असा निर्णय घेतला आहे. एकीकडे हायकोर्टाने आज भाजपच्या तीन याचिका फेटाळून लावला. मात्र जिल्हा न्यायालयाच्या या निकालामुळे भाजपला थोडा दिलासा मिळाला आहे.