Home क्राईम अरे बापरे… : वडिलांनीच केला मुलाचा खून ! (Father killed Son In...

अरे बापरे… : वडिलांनीच केला मुलाचा खून ! (Father killed Son In Jalgaon )

0
52


जळगाव Jalgaon प्रतिनिधी । पिता-पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात घडली असून एका बापाने आपल्या पोटच्या मुलाचाच खून केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सौरभ सुभाष वर्मा वय 26 रा. बालाजीपेठ हे दोन भाऊ, आई-वडिलांसह राहत होता. सौरभ वर्मा याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. अशाच पद्धतीने 12 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास दारू पिऊन सौरभ घरी आला. दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांचे सौरभला बोलचाल होऊन यातच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सौरभने हातातील चाकु काढून वडिलांना धमकावत होता. त्यामुळे वडिलांनी सौरभच्या हातातील चाकु हिसकावून त्याला दम दिला.

यातच सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता वडिलांच्या हातातील चाकु सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे शनिपेठ पोलिस ठाण्यात हजर झाले.

दरम्यान, या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. father killed son in jalgaon


Protected Content

Play sound