जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची काही दिवसांमध्ये ईडीकडून चौकशी होणार असून आता त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियात आक्रमक मोहिम सुरू केली आहे. यात ईडीच्या गैरवापरावर बोट ठेवत भाजपचा ईडीरूपी ‘डर्टी पिक्चर’ बरोबर नाही असा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. यातच खडसे यांना कोरोना झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर त्यांची चौकशी होणार असल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमिवर सोशल मीडियात खडसे समर्थक सक्रीय झाले असून त्यांनी व्यापक मोहिम सुरू केली आहे. यातील एका पोस्टमध्ये ईडीच्या गैरवापरावर बोट ठेवण्यात आला आहे. ही पोस्ट जशीच्या तशी आपल्याला सादर करत आहोत.
नाथाभाऊंना रोखण्यासाठी भाजपाचा आटापिटा
भाजपाच्या जीवघेण्या त्रासाला कंटाळून भाजपाचे ज्येष्ठ निष्ठावंत ज्यांनी स्व. प्रमोदजी,स्व.गोपीनाथजी, स्व. फुंडकर जी, यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात पोहचवली व मा. नाथाभाऊंनी एकट्याच्या बळावर महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री बनवला व भाजपाने बहुजन समाजातील नेतृत्वाचा वापरकरून मा. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले खरेतर त्या पदासाठी नाथाभाऊ खडसे दावेदार असतांना !
मग सुरूवात झाली महाराष्ट्रातील बहुजन समाजातील नेतृत्व संपवण्यासाठी भाजपाने भाजपातीलच बहुजन समाजातील नेत्यांवर आरोप करणे व राजकारण संपवणे उदा. पंकजाताई मुंडे, विनोदजी तावडे, प्रकाश मेहता, बावनकुळे इ. व ज्यांनी भाजपा विरोधी वक्तव्य केले त्यांना सत्तेचा वापर करून ईडीच्या नावाखाली त्रास देणे
नाथाभाऊंची गेल्या सहा वर्षात ५ वेळा चौकशी फक्त एकाच विषयासाठी भोसरी एमआयडीसी प्रकरणाची झाली.
१) पुणे अँन्टीकरप्शन
२)नाशिक अँन्टीकरप्शन
३)आयकर विभाग
४)आयकर विभाग छाननी
५)झोटिंग समिती
अशी ५ वेळा चौकशी झाली व आता सहाव्यांदा सामाजिक कार्यकर्त्या अंजलीबाई दमानिया यांचे सहकार्य घेऊन चौकशी करावी लागते ही अतिशय निंदनीय बाब आहे की जे सरकारी यंत्रणेला ५ वेळा चौकशी करून सापडले नाही ते दमानिया शोधुन देतील की ज्यांनी खडसेंवर जे आरोप केले त्याचा एकही पुरावा त्या आजपर्यंत महाराष्ट्राला दाखवू शकल्या नाही. त्या फक्त भाजपकडून काही विशिष्ट लोकांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक काम करतात हे महाराष्ट्र पाहतोय!
महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा आहे पण जे राजकारण आज महाराष्ट्र पाहतोय व भाजपा ज्या पद्धतीने राजकारण करतेय हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. सत्तेसाठी एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण बंद करुन महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण झाले पाहिजे. भाजपची सध्याची परिस्थिती ही जो भाजपात येईल तो पवित्र व जो विरोधात बोलला त्याची ईडी चौकशी…!
भाजपा सध्या महाराष्ट्रात ईडी च्या नावावर जिवंत आहे अन्यथा भाजपाचं कुठलही अस्तित्व नाही
खडसेंचा पिंड हा विरोधी पक्षाचा आहे ७ वर्ष खडसे रिकामे बसतील असं नाही या काळात त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांच्या कुंडल्या जमा केल्या असतीलच हे त्यांनी अनेकदा खाजगीत बोललेले आहे त्यात भाजपाचे डझनभर माजी मंत्री आहे हे नक्की
यासाठी भाजपाचा खडसेंना थांबवण्यासाठी आटापिटा सुरू आहे खडसेंचा धसका भाजपाने घेतलाय खडसेंचा भाजपाला भीती आहे हे अख्खा महाराष्ट्राला कळतयं. भाजपा सत्तेसाठी हापापली तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भाजपविषयी नाराजी आहे, भाजपाच्या घाणेरड्या राजकारणाला जनता कंटाळली आहे
हे ईडी रूपी भाजपाचा डर्टी पिक्चर बरोबर नाही हे नक्की