जळगाव प्रतिनिधी । कृषी कायद्यांना विरोध करणार्यांचे अंतरंग जिहादी असून यात अनेक देशविघातक तत्वांचा सहभाग असल्याची जळजळीत टीका हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केली. ते आजपासून जळगाव दौर्यावर असतांना प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी कृषी आंदोलनापासून ते औरंगाबादचे नामांतर व वेब सेरीजमधील विटंबनेवर रोखठोक भाष्य केले.
हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई हे आज जिल्हा दौर्यावर आले आहेत. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, काही वेब सेरीजमध्ये हिंदू समाजाच्या दैवतांनी विटंबना करण्यात येत असून हिंदू सहिष्णूतेच्या नावाखाली हे खपवून घेत असल्याची बाब अतिशय चुकीची आहे. आपला याला विरोध आहे.
देशातील राजकीय नेत्यांची राजकीय आणि वैचारिक सुंता झालेली आहे. यामुळे औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या नावाला समर्थन दिली जात असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आपण औरंगाबादच्या नामांतरासोबत उस्मानाबादचे नाव धाराशीव करावे अशी मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.
देशात सध्या सुरू असणार्या कृषी आंदोलनांमध्ये देशद्रोही सहभागी असल्याचा गंभीर आरोप धनंजय देसाई यांनी केला आहे. ते म्हणाले की, या आंदोलनाचा आत्मा हा जिहादी आहे. यात काही भोळ्या-भाबड्या जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
खालील व्हिडीओत पहा धनंजय देसाई नेमके काय बोलले ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/468392854548465