Home Cities जळगाव महत्वाची बातमी : विद्यापीठासाठी पुन्हा सुरू होणार सीटी बस सेवा !

महत्वाची बातमी : विद्यापीठासाठी पुन्हा सुरू होणार सीटी बस सेवा !

0
27

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जुन्या बस स्थानकापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंत सीटी बससेवा पुन्हा सुरू करण्याचे निर्देशक विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिले आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, आधी जुन्या बस स्थानकापासून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंत सीटी बस धावत होते. मात्र ही बससेवा बंद करण्यात आली असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आणि विशेष करून विद्यार्थीनींची कुचंबणा होत होती. त्यांना पूर्णपणे खासगी रिक्षा वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत होते. त्यांना अगदी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.

या पार्श्‍वभूमिवर, जुने स्थानक ते विद्यापीठ कँपस यांच्यात पुन्हा सीटी बससेवा सुरू करावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याला आता यश आले असून लवकरच ही बस सेवा सुरू होणार आहे. या संदर्भात एस.टी.चे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी आगार व्यवस्थापकांना निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने दीपक कुमार गुप्ता यांनी पुन्हा एका महत्वाच्या मुद्याचा पाठपुरावा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.


Protected Content

Play sound