Home क्राईम रेल्वेमार्गाजवळ आढळला बाळाचा मृतदेह

रेल्वेमार्गाजवळ आढळला बाळाचा मृतदेह

0
57

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील बाजूस आज सकाळी बाळाचा मृतदेह आढळून आला आहे.

या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज नगराकडे जाणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील बाजूला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला आज सकाळी बाळाचा मृतदेह आढळून आला. या संदर्भातील माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्राथमिक माहिती जमा करण्यास प्रारंभ केला आहे.

या बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? त्याचा मृतदेह रूळांजवळ कसा आला ? याबाबत माहिती मिळालेली नसली तरी आता याबाबत पंचनामा झाल्यानंतर पोलीस चौकशीतून बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound