Home Cities जळगाव अभिमानास्पद : अर्चित पाटीलला राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

अभिमानास्पद : अर्चित पाटीलला राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

0
33

जळगाव प्रतिनिधी । येथील अर्चित राहूल पाटील याला आज राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या वतीने आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्याला पुरस्कार देऊन सन्मानीत केले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा कोरोनाची आपत्ती असल्यामुळे हा सोहळा ऑनलाईन या प्रकारात पार पडला. यामध्ये अर्चीत राहूल पाटील याला संशोधनासाठी बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधल्यानंतर त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात त्याला हा पुरस्कार प्रदान केला.


Protected Content

Play sound