जळगावात दोन जुगार अड्डे उद्ध्वस्त; कुमार चिंथा यांच्या पथकाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने शहरात जेएमपी मार्केटसह मनीष मार्केटमध्ये सुरू असलेले दोन जुगाराचे अड्डे उधळून लावला आहेत. यात मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आली आहे. यातील एक छापा हा धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन यांच्या क्रीडा व सांस्कृतीक मंडळावर असल्याने या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना जेएमपी मार्केटमध्ये जुगाराचा हाय प्रोफाईल अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून त्यांनी रात्री बारा वाजेच्या सुमारास येथे छापा टाकला. यात बापु रघुनाथ सुर्यवशी (वय ३८ रा. गेंदालाल
मिल जळगाव); जुबेर फारुख खान (वय ३१ रा. संजय किराणा जवळ ,मास्टर कॉलनी); नजीर शफी पिंजारी ( वय ५० रा, जूना
कोळी पेठ जुने जळगाव); अब्दुल वाहेद अब्दुल रहेमान (वय ४४ रा. शनी पेठ ); शेख फय्याजोद्दीन कमरोद्दीन वय
४३ रा. शनी पेठ); आबेदखान शबीर खान (वय ३७ रा. पंचशिल नगर तांबापूर); अरमान रज्जाक पटेल (वय २८ रा,
गेदालाल मिल); मयुर संजय जगताप (वय २७ रा. व्दारका नगर ); परशुराम बन्सी चावरे (वय ४९ रा. वाल्मीक नगर
जळगाव); सलीम शहा अब्बास शहा (वय ५५ रा. रथ चौकाजवळ जामा मशिद); तुषार नरेद्र वरयाणी वय ३९ रा.
सिंधी काँलनी जळगाव); सुकदेव ज्योतीराम गवळी वय ५१ रा. रामेश्‍वर कॉलनी जळगाव व पंकज शरद पवार
वय २८ रा. व्दारका नगर जळगाव हे जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडून १९ लाख ७० हजार ५०० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, धरणगाव येथील ज्ञानेश्‍वर भादू महाजन हे जुन्या बस स्टँडच्या मागील बाजूस असणार्‍या मनीष मार्केटमध्ये योगेश्‍वर क्रीडा व सांस्कृतीक मंडळाच्या नावाखाली जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती कुमार चिंथा यांना मिळाली होती. या अनुषंगाने आज दुपारी या ठिकाणी छापा टाकण्यात आला. येथे देखील काही जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले आहे. तसेच येथे सोशल डिस्टन्सींगसह अन्य बाबींचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने त्यांच्या विरूध्द ज.मु. अ‍ॅक्ट कलम १२(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या छाप्यात धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर भादू महाजन यांच्या विरूध्द कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि धनंजय येरुळे, पोनि भिमराब नांदुरकर, सपोनि रविंद्र बागुल, उपनिरीक्षक अरुण सोनार,उपनिरिक्षक चंद्रकात पाटील, कॉन्स्टेबल फुसे, उन्हाळे, प्रणेश ठाकरे, रतन गिते व पोना
किशोर निकुंभ यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content