Home Cities जळगाव …आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळले भजे ! (व्हिडीओ)

…आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळले भजे ! (व्हिडीओ)

0
51

जळगाव प्रतिनिधी । वाढत्या बेरोजगारी विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरात काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ भजी तळून निषेध नोंदविला.

यावेळी आ. डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, ग्रामिण युवक अध्यक्ष ललित बागुल, शहर युवक अध्यक्ष अभिषेक पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संजय गरूड, गफ्फार मलिक व अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेथे सिलिंडर, शेगडी, कढई, बेसन पीठ, तेल असे सगळे साहित्य आणण्यात आले होते. यावेळी नेत्यांनी तळलेले भजे उपस्थितांना खाण्यासाठी देण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या निषेधाचा हा प्रकार येथून जाणार्‍या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला.

पहा– राष्ट्रवादी काँग्रेसचे भजी तळण्याचे आंदोलन !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound