जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटेनगर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ एका तरुणाचा धारदार शस्त्राने खुन झाल्याची घटना आज रात्री घडली. या घटनेमुळे खोटे नगर परिसरात खळबळ उडाली आहे.
महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या असे मयत तरुणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, खोटेनगरातील रहिवासी महेश वासुदेव पाटिल ऊर्फ डेम्या याला मागील भांडणाचे कारणावरून एकाने धारदार शस्त्राने भोसकल्याची घटना आज ९.४५ वाजेच्या सुमारास घटना घडली. खुन झाल्यानंतर परिसरातील नागरीकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. तालूका पोलिस ठाण्याचे निरीक्षकांसह पोलिस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात एकच आक्रोश केला होता.
बापू संतोष राजपूत (रा. हिराशिवा कॉलनी) हा जखमी झाला. बापू यानेच डेम्याचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बापूवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत डेम्यावर यापूर्वी हाणामारी, जबरीलूट, खुनाचा प्रयत्न असे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २५ जून रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवत असताना त्याला अटक झाली होती. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर लागलीच त्याचा खून झाला.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला बापू राजपूत हा देखील सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर दोन खुनांचा आरोप असून यातील एकात तो निर्दोष सुटला असून दुसर्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या कोरोनामुळे त्याला जामीन मिळाला असून जामीनावर असतांनाच त्याने तिसरा खून केला आहे.