जळगाव (प्रतिनिधी) शहरात साफसफाईसाठी सुमारे ७५ कोटी रुपये खर्चाची निविदा वादग्रस्त वॉटरगेट कंपनीस न देता महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता रस्ते व गटारी व व्यापारी संकुलने साफसफाईसाठी निविदा न काढता शासनाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठरवून दिलेल्या किमान वेतन दराने मानधनावर सफाई कामगारांची भरती करवी अशी मागणी निवेदनाद्वारे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घंटागाडीद्वारा कचरा संकलनाचा काम घेणाऱ्या कंपनीत काम करणारे सफाई कामगार यांना किमान वेतन दरानुसार वेतन व इतर देय रक्कम देण्याची मागणी महापालिका स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांना दिलेल्या निवेदनात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अरुण चांगरे यांनी केली आहे. निवेदनावर संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री जयप्रकाश चांगरे, प्रदेश सरचिटणीस पं . जितेंद्र चांगरे, जिल्हा अध्यक्ष दिलीप चांगरे, महानगर अध्यक्ष अमरसिंग रानवे, महानगर उपाध्यक्ष राकेश सनकत यांच्या स्वाक्षरी आहे.