Home Cities जळगाव बिग ब्रेकींग : जिल्हा दूध संघातील प्रशासक मंडळ अवैध; कोर्टाचा निर्णय !...

बिग ब्रेकींग : जिल्हा दूध संघातील प्रशासक मंडळ अवैध; कोर्टाचा निर्णय ! : आ. खडसे

0
107

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा सहकारी दूध संघातील न्यायालयीन वादात आज कोर्टाने संचालकांच्या बाजूने निर्णय दिला असून प्रशासक मंडळ अवैध असल्याने ते बरखास्त करण्यात आल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, जिल्हा दूध संघातील वाद हायकोर्टात पोहचला होता. राज्य सरकारने यावर प्रशासक मंडळ बसवून या मंडळाने कारभार हाती घेतला होता. संचालक मंडळांचे अधिकार काढण्यात आले होते. तसेच, संचालक मंडळाच्या कालावधीतील व्यवहारातील कथित अनियमिततेवरून राज्य सरकारने चौकशीचे आदेश देखील जारी करण्यात आले होते.

या संदर्भात आज हायकोर्टाने निकाल दिला असून याबाबतची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ला कॉल करून दिली. ते म्हणाले की, न्यायालयाने संचालक मंडळाचे म्हणणे मान्य करून प्रशासक मंडळ अवैध असून ते बरखास्त करण्यात यावे असा निकाल दिला आहे. यासोबत राज्य सरकारची चौकशी थांबविण्याचे निर्देश दिले असून एन.जे. पाटील यांनी केलेले आरोप देखील फेटाळून लावले आहेत. या संदर्भातील माहिती आपण लवकरच प्रसारमाध्यमांना देणार असल्याचेही त्यांनी ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ला सांगितले.


Protected Content

Play sound