जळगाव प्रतिनिधी । भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार उमेदवार आ. सुरेश दामू भोळे यांना जळगाव मेडिकल डीलर्स असोसिएशनच्या वतीने सुनील भंगाळे व सर्व असोसिएशन पदाधिकारी यांनी बिनशर्त पाठींबा जाहीर केला.
याबैठकी प्रसंगी माजी महापौर विष्णू भंगाळे, ललित चौधरी, अनिल झंवर, कनकमल रांका, संजय नारखेडे, नगरसेवक महेश चौधरी हे मंचावर प्रमुख उपस्थित होते. सदर बैठकीला खालिद भाई, इलियास बागवान, रुपेश चौधरी, ब्रिजेश जैन, दिनेश मालू, मनीष अत्तरदे, पंकज पाटील, दीपक चौधरी, रवींद्र वऱ्हाडे, संजय तिवारी, अमित चांदीवाल यासह असंख्य केमिस्ट बांधव उपस्थित होते.
जनरल प्रॅक्टीशनर डॉक्टरांचाही पाठींबा
जनरल प्रॅक्टीशनर डॉक्टरांच्या वतीने राजूमामा यांनी गेल्या पाच वर्षभरामध्ये जळगाव शहर आरोग्यमय राहावे म्हणून अतिशय उल्लेखनीय कार्य केले असून यामध्ये डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, मलेरिया, मेडिकल वेस्ट यासाठी जनरल प्रॅक्टीशनर डॉक्टरांना अनमोल सहकार्य दिले असून शहराच्या आरोग्य सेवेसाठी पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार २०० ते २५० डॉक्टरांनी केला. या प्रसंगी भाजपा प्रदेश चिटणीस आ. स्मिताताई वाघ व बेटी बचावो जिल्हा संयोजक डॉ. अस्मिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकी प्रसंगी भाजपा वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र चौधरी, डॉ. रितेश पाटील, नगरसेवक डॉ. विरेन खडके, डॉ. अविनाश महाजन, डॉ. सतीश शिंदाळकर, डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. धनराज चौधरी, डॉ. सुशील मंत्री, डॉ. शरद पाटील, डॉ. विवेक शिंदे, शरयू विसपुते, सौ. शिंदाळकर, भरत बोरोले इत्यादी उपस्थित होते. सदर बैठक यशस्वीतेसाठी वर्गवार संमेलन प्रमुख दीपक सूर्यवंशी, निवडणूक अभियान समिती प्रमुख लीलाधर (बापू) ठाकरे व निवडणूक बुद्धिजीवी संमेलन प्रमुख प्रा. भगतसिंह निकम यांनी प्रयत्न केले असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.