जळगाव प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेल्या कर्जाची मुदतीआधी फेड केल्याने आता महापालिकेला या कर्जातून मुक्ती मिळाल्याची माहिती आज महापौर सीमा भोळे यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, महापालिका प्रशासनाने (नगरपालिका असतांना ) जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले होते. यासाठी दरमहा एक कोटी रूपयांची फेड केली जात होती. तथापि, यासाठी चार महिने बाकी असतांना प्रशासनाने एकाच वेळी ४.६९ कोटी रूपये भरले. यामुळे महापालिका आता जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त झाल्याची माहिती महापौर सीमा भोळे यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी आमदार राजूमामा भोळे व महापौर सीमा भोळे यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र प्रदान केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, विशाल त्रिपाठी आदींची उपस्थिती होती.
पहा : महापौर सीमा भोळे यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ.