जळगाव प्रतिनिधी । घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यास असमर्थ ठरलेले मनपा आयुक्त उदय टेकाळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे ईमेल द्वारा मागणी केली आहे.
दिपककुमार गुप्ता यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे की, बहुचर्चित असलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात आरोपींमध्ये काही विद्यमान नगरसेवक आहे. याबाबत मनपा आयुक्त उदय टेकाळे यांच्याकडे लेखी स्वरूपात घरकुल घोटाळ्यातील आरोपी असलेले विद्यमान नगरसेवक अपात्र करण्याची मागणी केली होती. मात्र टेकाळे यांनी यासंदर्भात गंभीर्य लक्षात न घेतला कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळेश्री टेकाळे यांच्यावर महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम कलम ७२ क तसेच कामकाज दिरंगाई कायदा कलम १०, १०(१), १०(२) व महाराष्ट्र सेवा शिस्तभंग कायद्यानुसार कार्यवाही व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.