केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा : राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार ! ( व्हिडीओ )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अवमानकारक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल अशा मागणीचे निवेदन आज महिला राष्ट्रवादीतर्फे देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह आज जळगाव जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यात म्हटले आहे की, देशाचे नेत महाराष्ट्राचे जाणता राजा आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अभिनेत्री केतकी चितळे यानी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने आदरणीय पवार साहेबांचा अवमान केला असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर पोस्ट टाकत असतांना सुरुवातीलाच तुका म्हणे मणजे तिने तुकाराम महाराजांच्या देखीन अपमान केला आहे. हे वाक्य टाकून तिने महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदायाचे व तमाम जनतेचा अपमान करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केतकी चितळे हिच्या सारख्या मुर्ख आणि माथेफिक व्यक्तींनी भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी करून नये याकरिता तिचे फसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सर्व अकाऊंट आपण कायम स्वरूपी ब्लॉक करावे अशी आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मागणी करीत आहोत.

या तक्रार अर्जात पुढे नमूद केले आहे की, या आधी सुध्दा केतकी चितळे यांनी खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक गोष्टी शेअर केल्या होत्या तसेच काही ज्येष्ठ व्यक्तींच्या बाबतीत या अगोदर सुध्दा तिने वादग्रस्त विधान केले होते. असे काहीतरी विधान करुन सतत प्रसिध्दी मिळवायची आणि त्या माध्यमातून आपने हित साध्य करून घ्यायची असा घाणेरडा व गल्लीच्छ हेतू ठेवून केतकी चितळे या पोष्ट शेअर करीत असते. यामुळे तिच्यावर गंभीर गुन्हा दाखल करुन अटक रावी जेणेकरुन भविष्यात तिने अशा प्रकारच्या पोस्ट टाकतांना शंभर वेळा विचार केला पाहिजे. तसेचअभिनेत्री केतकी चितळे हिचे मानसिक
संतुलन व्यवस्थित आहे किंवा नाही हे तपासून घेतले पाहिजे का तिला मेंटल हॉस्पिटलची गरज आहे. तिला एक मानसोपचार तज्ञाची गरज आहे. हे सुध्दा पोलिस खात्याने तपास करून घ्यावा तसे काही आढळल्यास तिच्या उपचाराचा खर्च आम्ही स्वतः करण्यास तयार आहोत तरी याची गंभीर दखल घेऊन त्यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या तक्रार अर्जात देण्यात आला आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्षा मंगलाताई पाटील यांच्यासह अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा अश्‍विनी देशमुख, युवती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा कल्पीता पाटील, मीनाक्षी पाटील, प्रतिभा शिरसाठ आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या.

खालील व्हिडीओत पहा महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दिलेले निवेदन आणि व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/999275424125055

Protected Content