Home क्राईम जळगाव केटामाईन प्रकरण: सात जणांना सश्रम कारावासाची शिक्षा

जळगाव केटामाईन प्रकरण: सात जणांना सश्रम कारावासाची शिक्षा


ketamine

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील रूखमा इंडस्ट्रिजमध्ये डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या (डीआरआय) मुंबई विभागातील अधिकाऱ्यांनी 14 डिसेंबर 2013 मध्ये छापा टाकून सुमारे 118 कोटी रूपये किंमतीचे केटामाईन या अंमलीपदार्थ साठा जप्त केला होता. याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सात जणांना दोषी ठरवत पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आज जिल्हा सत्र न्यायालयात न्या. ठुबे यांनी दोषी ठरलेल्या सात जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर सोबत सात जणांना ठोठावलेला दंडाची रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

जिल्हा सत्र न्यायालयातील न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात आज केटामाईन प्रकरणानाची सुनावणी होती. रूखमा इंडस्ट्रिजमध्ये केटामाईन सापडल्यानंतर आरोपींच्या घरी तपासणी करण्यात आली. त्यात आरोपी विकास चिंचोले यांच्या घरात 362 ग्रॅम सोने आणि अडीच कोटीची रक्कम जप्त करण्यात आली होती. सोबत केटामाईन प्रकरणात मास्टरमाइंड मुख्य आरोपी विकास पुरी याची बायोसिन्थॅटिक कंपनीतील मशिनरी, सर्व सामान, तसेच रूखमा इंडस्ट्रिज मधील संपुर्ण मशिनरी आणि वापरण्यात आलेल्या तीन चार चाकी वाहने देखील सरकार जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. डीआरआयतर्फे विशेष सरकारी वकील ॲड. अतुल जाधव आणि ॲड. अतुल एस. सरपांडे, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांनी कामकाज पाहिले. सातही जणांना सुनावलेल्या शिक्षा ह्या एकत्रितरित्या भोगाव्या लागणार आहेत.

अशी आहे शिक्षेची तरतूद

1. वरूण कुमार तिवारी, रा. विकरोली मुंबई
कलम 8 सी, 22 सी प्रमाणे – 10 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 10 वर्ष सश्रम कारावास आणि 1 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाचा सश्रम कारावास

2. श्रीनिवास राव रा. पवई मुंबई
कलम 8 सी, 23 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास, दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावास
कलम 28 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास, दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्ष सश्रम कारावास

3. विकास पुरी रा. पवई मुंबई
कलम 8 सी, 22 सी प्रमाणे – 13 वर्ष सश्रम कारावास आणि 1.75 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 8 सी, 23 सी प्रमाणे – 13 वर्ष सश्रम कारावास आणि 1.75 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 27 अ प्रमाणे – 13 वर्ष सश्रम कारावास आणि 1.75 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 13 वर्ष सश्रम कारावास आणि 1.75 लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

4. खेमा झोपे, रा. अंबरनाथ ठाणे
कलम 8 सी, 22 सी प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

5. नितीन चिंचोले रा. आदर्श नगर, जळगाव
कलम 25 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

6. रजनिश ठाकूर, सिकंदराबाद,
कमल 8 सी, 23 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि एक लाख 75 हजार रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 12 वर्ष सश्रम कारावास आणि एक लाख 75 हजार रूपये दंड. दंड न भरल्यास तीन वर्षाचा सश्रम कारावास

7. एस.एम.संथिककुमार, मैलापूर, चेन्नई
कलम 8 सी, 23 प्रमाणे – 11 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाच सश्रम कारावास
कलम 29 प्रमाणे – 11 वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रूपये दंड. दंड न भरल्यास अडीच वर्षाच सश्रम कारावास

काय आहे हे प्रकरण
अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या केटामाइनचा सुमारे 1.2 टनचा साठा केंद्रीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जळगावात शुक्रवारी 13 डिसेंबर 2013 रोजी मध्यरात्री पकडला होता. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत 118 कोटी रुपये होती. उमाळा शिवारात आणि औद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रीज येथे छापा टाकून डीआरआय पथकाने 1175 किलो केटामाइन जप्त केले होते. रूखमा इंडस्ट्रीजचे नितीन चिंचोले आणि मुंबईस्थित विकास पुरी हे अमली पदार्थ निर्मिती व तस्करीचे सूत्रधार असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सुरूवातीला पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली होती. तर मास्टरमाइंड विकास पुरी हा मुख्य सुत्रधार होता. विकास पुरीने औषधशास्त्र विषयात एम.टेक. केले असून या क्षेत्रातला तो तज्ज्ञ मानला जात होता. त्याच्या व्हीसी फार्मा आणि स्पेशालिटी केमिकल या दोन कंपन्या रत्नागिरी येथे आहेत.

या 12 संशयितांवर होता गुन्हा
वरूण कुमार तिवारी, गौरी प्रसाद पाल दोन्ही रा. विकरोली मुंबई, नित्यानंद थेवर (वय 27) रा. धारावी मुंबई, कांतीलाल उत्तम सोनवणे रा. जळगाव, श्रीनिवास राव, विकास पुरी रा. पवई मुंबई, खेमा मधुकर झोपे रा. अंबरनाथ ठाणे, विकास रामकृष्ण चिंचोले रा. जळगाव, नितीन चिंचोले रा. आदर्श नगर, रजनिश ठाकूर, सिकंदराबाद, एस.एम.संथिककुमार मैलापूर, चेन्नई आणि विशाल सोमनाथ पुरी रा. जनकपुरी नवी मुंबई अशा 12 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोट –
केटामाईन प्रकरण हे राज्यातली सर्वात मोठे प्रकरण होते. हा खटला संवेदनशिल होता. या प्रकरणाबाबत लोकांना पहिल्यापासून उत्सुकता लागून होती. केटामाईन नेमके काय असते, त्यापासून काय होते, याची माहिती लोकांना नव्हती. या प्रकरणासाठी डीआरआय विभागाने चांगल्यारितीने मदत केली. त्यांना रात्री बेरात्री फोन करून या घटनेची वेगवेगळ्या पध्दतीने माहिती घेत होतो. सातही जणांची जी शिक्षा न्यायालयाने दिली ती योग्य आहे. भविष्यात अश्या प्रकारचा गुन्हा करण्याआगोदार आरोपी दहा वेळा विचार करावा लागेल.
– विशेष सरकारी वकिल ॲड. संभाजी जाधव

असे गुन्हे केल्यानंतर उच्च शिक्षीत लोक पैसे देवून असे प्रकरण दाबले जाते. मात्र हे प्रकरण असे होते की नवपिढीला नशेत घालवण्याकडे कल होता. यात प्रथम: उच्चभ्रु लोकांना ही शिक्षा झाली हे वैशिष्ट्य आहे. कारण पैसे देवून सर्व काही सिध्द होत नाही. याचा काही लोक गैरफायदा घेत होते. विशेष म्हणजे आज एमआयडीसीतील आजारी कंपनी अशा गोष्टी करण्यासाठी परावृत्त होतात. केटामाईन हे प्रकरण यासाठी एक उदाहरण आहे.
– ॲड. अतुल सरपांडे, उच्च न्यायालय मुंबई


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound