जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘बेस्ट डिजीटल बँक’ तर अध्यक्षा रोहिणी खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकींग समिट आणि फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटीव्ह बँक यांच्यातर्फे आज प्रदान करण्यात आला.
आज एनसीबीएस अर्थात ‘नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकींग समिट’ आणि एफआयसीबी म्हणजेच ‘फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटीव्ह बँक’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे कार्यक्रम २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी आभासी म्हणजेच व्हर्च्युअल स्वरूपात पार पडले.
या परिषदेत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. यात बँकेला ‘बेस्ट डिजीटल बँक’ या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ पुस्काराने गौरविण्यात आले.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतांना बँकेला सहकार क्षेत्रातील अतिशय मानाचे दोन पुरस्कार मिळाल्याची बाब लक्षणीय आहे. हा बँकेच्या यशस्वी वाटचालीत शिरपेचातील मानाचा तुरा मानला जात आहे.