जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेतर्फे यंदाचे प्राथमिक शिक्षकांसाठीचे आदर्श शिक्षक पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आज आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एक अशा प्रकारे एकूण १५ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात मनीषा गोविंद चौधरी ( शिरसाळे, ता. अमळनेर ); सचिन हिलाल पाटील (पिंपळगाव ता. भडगाव); समाधान रामचंद्र जाधव (शिंदी, ता. भुसावळ ); मालती संजय तायडे (बोदवड); संजीव सिताराम थेटे (चौगाव, ता. चोपडा); गोरख मोतीराम वाघ (चौगाव, ता. चाळीसगाव); ज्योती लिलाधर राणे (साळवा, ता. धरणगाव); विनायक गोकुळ वाघ (खेडी, ता. एरंडोल); सुशील भागवत चौधरी (पाथरी, ता. जळगाव); नथ्थू धनराज माळी (चिंचखेडे बुद्रकु ता. जामनेर); वैशाली अशोक नांद्रे (बोळे तांडा, ता. पारोळा ); किशोर अभिमन पाटील ( वडगाव, ता. पाचोरा); सुशील वसंत हडपे (मुक्ताईनगर); कल्पना दिलीप पाटील (निंबोल, ता. रावेर); विनोद मनोहर सोनवणे (डांभुर्णी, ता. यावल) या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.