जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदार संघातून आज माजीमंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र विशाल देवकर आणि जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तम पंडित सपकाळे या तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ना. गुलाबराव पाटील, पुष्पा महाजन, लकी टेलर आणि चंद्रशेखर अत्तरदे असे चार प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
जळगाव ग्रामीण मतदार संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. गुलाबराव पाटील हे असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून पुष्पा महाजन रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार विशाल देवकर यांनी माघार घेताना पुष्पा महाजन यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
गील पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा पराभव केला होता. नंतरच्या निवडणुकीत गुलाबराव देवकरांचा गुलाबराव पाटील यांनी पराभव केला होता . यानंतर गुलाबराव पाटलांना देखील मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यांनी कोट्यवधींची विकासकामे केल्याचा दावा केला असून या विकासकामांच्या बळावर ते पुन्हा निवडणुकीला सामोरे जात असून त्यांचे कट्टर स्पर्धी गुलाबराव देवकर यांना घरकुल प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. यामुळे गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये कट्टर स्पर्धी यंदा राहणार नाही याची खात्री असल्याने त्यांना विजयाची शाशवती होती. मात्र विशाल देवकर यांनी माघार घेतल्याने गुलाबराव पाटलांचा मार्ग सुकर झाला आहे.