Home Cities धरणगाव जळगाव ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार

जळगाव ग्रामीण मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार


shivsena

जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मातोश्री मुबई येथे जावून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा उपस्थितीत किशोर राघो पाटील-दोनगाव, शरद पाटील-भोकणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगावचे नगरसेवक पप्पू भावे, श्री.कुमावत, दत्तू ठाकूर, दीपक सावळे, आबा माळी, सावकार पाळधी, संजय पाटील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound