जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे येथे ९ ते १४ मार्च दरम्यान होणाऱ्या अस्मिता हॉकी राज्यस्तरीय लीग अंतर्गत खेलो इंडिया स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून, संघ आज पुण्यास रवाना झाला. या संघाची घोषणा हॉकी जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी शुक्रवारी ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता यांनी केली आहे.
जळगावच्या संघात पुनम सोनवणे हिची कर्णधार म्हणून निवड झाली असून देवयानी सोनवणे उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. तर इतर खळाडूंमध्ये जळगावातून उत्कर्षा पाटील, गायत्री बाविस्कर, दीपिका कोळी, पुर्ती पाटील, स्नेहल कोळी, गायत्री कोष्टी, शितल पाटील, कल्याणी आस्वार, नम्रता बाविस्कर, उज्वला पाटील, भुसावळातून सदफ नाज, गौरवी पाटील, मैथली चौधरी, प्रांजल ढाके, तर अमळनेरातून रितिमा बारेला आणि राखीव म्हणून रोहिणी ज्ञानेश्वर कोळी यांची निवड करण्यात आली आहे. संघाला शुभेच्छा देण्यासाठी हॉकी महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष डॉ. अनिता कोल्हे, सचिव फारूक शेख, हीमाली बोरोले, वर्षा सोनवणे, इम्तियाज शेख, ॲड. आमिर शेख, रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू अकील शेख आणि आरीफ कुरेशी उपस्थित होते.